कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता विभागाच्यावतीने उमेदवारांना विविध खासगी क्षेत्रात निर्माण
होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने दि. 17 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत ‘दीनदयाळ
उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी
यांनी दिली.
या
ऑनलाईन रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अनेक खासगी उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला
असून रिक्तपदांची नोंदणी महास्वयंम या संकेतस्थळावर केली आहे. मेळावा केवळ ऑनलाईन
पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील इच्छुक
उमेदवारांनी आपल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे या विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर
लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्तपदासाठी आवश्यक
पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पसंतीक्रम व इच्छुकता ऑनलाईन नोंदवावी.
इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांना
त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोईनुसार 18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या
मुलाखतीच्या ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्टंद्वारे अथवा दुरध्वनीद्वारे उद्योजकांकडून
कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
अधिक
माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 0231-2545677 वर संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.