** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, February 14, 2022

कंत्राटी पध्दतीने अशासकीय पदभरती

 


कोल्हापूर दि. 14 (जिमाका) :  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित सैनिकी मुलांचे/ मुलींचे वसतिगृह कोल्हापूर, पन्हाळा व महासैनिक दरबार हॉल व लॉन करिता माजी सैनिक संवर्गातून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात रोजंदारी पध्दतीने सहायक वसतीगृह अधीक्षक, सहायक वसतीगृह अधिक्षिका, स्वयंपाकी, पहारेकरी, सफाई कर्मचारी व माळी अशी पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी अर्ज दि. 18 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे जमा करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

 माजी सैनिक प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल.  निवड करण्याची किंवा एखादा अर्ज कोणतेही कारण न देता निकाली काढण्याचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी राखून ठेवले असून अधिक माहितीसाठी 0231-2665812 वर संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.