इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

विविध क्षेत्रामध्ये मोफत रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रम 20 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन माहिती नोंदवावी

 


 

       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका):  किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत  अंतर्गत विविध क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक – युवतींना विविध क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मोफत प्रशिक्षणाकरिता जास्तीत- जास्त इच्छुक उमेदवारांनी माहिती Google Form link - https://forms.gle/nDLme9ayyLCdZ6Va6 (QR Code ) या लिंकवर दिनांक 20 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी  केले आहे.

  Agriculture, Food Processing, Apparel, Iron & Steel, Construction, Retail, IT-ITeS, Tourism & Hospitility, BFSI, Electronics, Power, Beauty & Wellness, Plumbing, Media & Entertainment इत्यादी क्षेत्रामधील या प्रशिक्षणाव्दारे युवक-युवतींचे कौशल्य विकसीत करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्ह्यामध्ये किमान कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम २०२१-२२  राबविला जाणार आहे.

           या योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण प्रामुख्याने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, प्रधानमंत्री कौशल्य केंद्र व स्किल इंडिया पोर्टलवर नोंदणीकृत प्रशिक्षण केंद्र यांच्या माध्यमातून देण्यात येणार असून उमेदवारांसाठी पूर्णपणे निशुल्क असणार आहे.

अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या ०२३१-२५४५६७७ या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा व जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली नावे प्रशिक्षणाकरिता नोंदवावी, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.