कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवार दि. 12 मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा
विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पंकज देशपांडे यांनी दिली आहे.
या अदालतीमध्ये
जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन प्रलंबित दिवाणी व तडजोडयोग्य फौजदारी खटले, मोटर अपघात
खटले तसचे दखलपूर्व खटले ठेवण्यात येणार आहेत. याव्दारे सर्व बँका, पतसंस्था, इन्शुरन्स
कंपन्या तसचे एमएसईबी, राज्य परिवहन महामंडळ व इतर संबंधित कंपन्यांनी या लोकअदालतीध्ये
आपल्या प्रिलिटीगेशनच्या केसेस ठेवायच्या असतील तर त्यांनी योग्य कागदपत्रासह दि.
28 फेब्रुवारी पर्यंत सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क
साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.