इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणीचे अर्ज सादर करावेत

 


 

              कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):  प्रकल्पग्रस्तांच्या अडीअडचणींचा निपटारा होण्यासाठी व प्रकल्पग्रस्तांचे कामकाज जलदगतीने होण्यासाठी पाटबंधारे प्रकल्पातील जमीन व भूखंड मिळण्यास शिल्लक असलेल्या प्रकल्पग्रस्तांनी जमीन व भूखंड मागणीचे अर्ज नमुद केलेल्या ठिकाणी  सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत समक्ष उपस्थित राहून सादर करावेत, असे आवाहन पुनर्वसन उपजिल्हाधिकारी अश्विनी  सोनावणे-जिरंगे यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

प्रकल्पाचे नाव, संबंधित उपविभागाचे अधिकारी, अर्ज करावयाचा दिनांक व अर्ज करावयाचे ठिकाण याप्रमाणे-

चिकोत्रा- राधानगरी कागल विभाग, कोल्हापूर - दि. 15 फेब्रुवारी रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर.

आंबेओहोळ- गडहिंग्लज विभाग- दि. 16 फेब्रुवारी रोजी आजरा तहसिलदार कार्यालय.

तुळशी- राधानगरी कागल विभाग, कोल्हापूर दि. 23 व 24 फेब्रुवारी रोजी तहसिलदार  कार्यालय राधानगरी.

       राधानगरी कागल विभाग, कोल्हापूर- दि. 2 व 3 मार्च रोजी तहसिलदार कार्यालय, कागल.

पाटगांव व दुधगंगा-व्हनगुत्ती वसाहती-  आजरा भुदरगड विभाग- दि. 8 मार्च रोजी तहसिलदार कार्यालय, भुदरगड.

दुधगंगा- करवीर विभाग- दि. 15 व 16 मार्च रोजी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर व राधानगरी कागल विभाग, कोल्हापूर- दि. 22 व 23 मार्च रोजी तहसिलदार कार्यालय, राधानगरी

 नमुद केलेल्या कॉलम नंबर 4 मधील दिनांकास कॉलम नंबर 5 मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी ज्या प्रकल्पग्रस्तांना जमीन व भूखंड मिळालेला नाही  त्यांनी अर्ज व त्यासोबत 65 टक्के रक्कम भरल्याचा पुरावा व बुडीत जमिनीची सर्व कागदपत्रे सादर करावीत.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.