** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, February 9, 2022

हातकणंगले ते रुकडी दरम्यान गेट क्र. 18 मधून होणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद

 


 

कोल्हापूर, दि. 9 (जिमाका) : हातकणंगले ते रुकडी दरम्यान रुकडी गावच्या हद्दीतील रेल्वे क्रॉसिंग गेट नं. 18 च्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. दि. 11 फेब्रुवारी ते दि. 10 मार्च या कालावधीसाठी हातकणंगले ते रुकडी दरम्यान रुकडी गावाच्या हद्दीतील गेट क्र. 18 मधुन होणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरुपात बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे. वाहतूक सुरक्षा उपाय योजनेद्वारे वाहतूक नियंत्रित करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी निर्गमित केले आहेत.

जनतेच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावावी, असे आदेशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.