इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप कॅम्पचे आयोजन

 


       कोल्हापूर, दि.1 जिमाका): चांदोली अभयारण्य प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या राहत्या वसाहतीपासून 8 कि.मी. परिसरातील जमीन वाटप करण्यासाठी कॅम्प आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अश्विनी सोनवणे-जिरंगे यांनी दिली आहे.

         खाली नमूद केल्याप्रमाणे जमीन दाखविण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

बाधीत गावाचे नाव, पुनर्वसीत वसाहतीचे नाव व जमिनी दाखविण्याचा दिनांक याप्रमाणे-

        चांदेल ता. शाहूवाडी -भादोले वसा. क्र. 1 व 2 हातकणंगले- दि. 14 फेब्रुवारी व लाटवडे    ता. हातकणंगले- दि. 15 फेब्रुवारी.

         निवळे ता. शाहूवाडी- वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले-  दि. 16 फेब्रुवारी व गलगले    ता. कागल - दि. 17 फेब्रुवारी

         तनाळी ता. शाहूवाडी- नरंदे ता. हातकणंगले- दि. 18 फेब्रुवारी  व काखे ता. पन्हाळा-       दि. 22 फेब्रुवारी

         ढाकाळे ता. शाहूवाडी- नवे पारगाव ता. हातकणंगले- दि. 23 फेब्रुवारी  व भादोले            ता. हातकणंगले - दि. 14 फेब्रुवारी

        सोनार्लीपैकी धनगरवाडा ता. शाहूवाडी- भेंडवडे ता. हातकणंगले- दि. 24 एप्रिल

        तांबवेपैकी कुल्याचीवाडी ता. शाहूवाडी- रुकडी ता. हातकणंगले- दि. 24 एप्रिल, माले      ता. पन्हाळा- दि. 25 फेब्रुवारी  व कोडोली ता. पन्हाळा- दि. 1 मार्च

        गोठणे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी- दानोळी ता. शिरोळ- दि. 2 मार्च, जैनापूर ता. शिरोळ-3 मार्च    वारुळ ता. शाहूवाडी- दि. 4 मार्च याप्रमाणे कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

        

000000

 

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.