कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती
कार्यालय) :- जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या
कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा,
दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी
देण्यात आली आहे. याचा लाभ 779 जण घेत आहेत.
करवीर
तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- घुगरे सर यांचे निवासी
गुरुकुल वडगाव. अशोकराव माने ग्रुप वाठार
तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय
आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी
- पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी. कागल
- श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी
कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.