** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 3, 2020

कसबा बावडा येथील मराठी कॉलनी प्रतिबंधीत क्षेत्र आदेश मागे - उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर


           
            कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का) :- कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कसबा बावडा येथील मराठा कॉलनीमध्ये लागू केलेला प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी आज एका आदेशान्वये मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.
            मराठी कॉलनीमधील 1 रुग्णाचे स्वॅबचे नमुने निगेटीव्ह आले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याने प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने  मराठी कॉलनी] कसबा बावडा, ता. करवीर, जि. कोल्हापूर या परिसरातील लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश उठविण्यात आला आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.