कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती
कार्यालय) :- जयसिंगपूरमधील पायोस हॉस्पिटलचे डॉ.
सतीश पाटील यांनी शिरोळ येथील कोव्हिड केअर सेंटर आणि कोव्हिड हेल्थ सेंटरसाठी
तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे यांच्याकडे मदत दिली.
यामध्ये 1 हजार अंघोळीचे साबण, 1 हजार कपडे धुण्याचे साबण, 1
हजार टुथपेस्ट, 1 हजार टुथब्रश आणि 2 हजार मास्कचा समावेश आहे.
इंडोकाऊंट फौंडेशनकडून हातकणंगले सेंटरसाठी मदत
हातकणंगले तालुक्यामधील कोव्हिड केअर सेंटरसाठी इंडोकाऊंट
फौंडेशनकडून 1 हजार 500 बेडशीट, 1
हजार 500 पिलो कवर, 5 हजार मास्क तसेच इतर दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून 2 हजार
सॅनिटायझरच्या बाटल्या, 1 हजार अंघोळीचे साबण, 1 हजार 500 कपडे धुण्याचे साबण आणि
1 हजार 500 टुथब्रश तहसिलदार प्रदिप उबाळे यांच्याकडे आज सुपूर्द केल्या.
000000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.