** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 10, 2020

आजअखेर 20 हजार 739 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील

 


   कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 223 प्राप्त अहवालापैकी 2 हजार 201 निगेटिव्ह तर 380 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3 अलवाह प्रलंबित, 1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह, Repeat Sample Report 3 तर 15 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 599 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 442 तर 157 पॉझीटिव्ह (124 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 365 पॉझीटिव्ह आले असे एकूण 902 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 32 हजार 220 पॉझीटिव्हपैकी 20 हजार 739 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 496 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 902 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-20, भुदरगड- 7, चंदगड-9, गडहिंग्लज-36, गगनबावडा- 5, हातकणंगले- 121, कागल-30, करवीर-91, पन्हाळा- 34, राधानगरी- 13, शाहूवाडी-23, शिरोळ- 67, नगरपरिषद क्षेत्र- 117, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 288 व इतर शहरे व राज्य 41 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-560, भुदरगड- 695, चंदगड- 690, गडहिंग्लज- 749, गगनबावडा- 86, हातकणंगले-3746, कागल-1075, करवीर-3494, पन्हाळा- 1141, राधानगरी- 855, शाहूवाडी- 733, शिरोळ- 1776, नगरपरिषद क्षेत्र-5341, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 हजार 274 असे एकूण  31 हजार 215 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 5 असे मिळून एकूण 32 हजार 220 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 32 हजार 220 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 20 हजार 739 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 985 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 496 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.