कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) :
राज्यात पोषण अभियानातंर्गत पोषण माह (सप्टेंबर 2020) दि. 30 सप्टेंबर पर्यंत साजरा करण्यात यावा,
असे निर्देश सर्व जिल्हा परिषद व सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना राज्य
प्रकल्प संसाधन कक्ष, पोषण अभियानच्या आयुक्त तथा राज्य प्रकल्प संचालक इंद्र मालो
यांनी दिले आहेत.
Supportive Supervision
पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/बाविप्रम/जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्यात
दोन वेळा CAS मधील प्रत्येक अंगणवाडीनिहाय सर्व सॅम बालकांची स्क्रिनिंग करुन
त्यांच्या पालकांची बैठक घेवून त्यांचे समुपदेशन करण्यात यावे. RBSK/आरोग्य विभागाशी समन्वय साधून CAS मधील
सर्व सॅम बालकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, या मुद्यांवर जास्तीत जास्त काम
करावे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी
व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोषण माह दरम्यान 2 सॅम व 2 मॅम बालकांना दत्तक
घ्यावे. अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या सॅम व मॅम बालकांचे पोषण व त्यांच्या
आरोग्याची काळजी घ्यावी. त्यांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी सर्वोतोपरी
प्रयत्न करावे. अल्पसंख्याक विभागाशी संपर्क साधून नयी रोशनी पोषण माह अंतर्गत
राबविण्यात यावा.
कॉमन सर्व्हीस सेंटर मध्ये
पहिल्या 1000 दिवसांचे महत्व तसेच लवकर स्तनपानाचे महत्व या विषयी पोषण माह मध्ये
जनजागृती करावी. पोषण माह राबवित असताना कोव्हिड-19 च्या अनुषंगाने शासनाने
वेळोवेळी दिलेल्या मागदर्शक सूचनांचे व प्रतिबंधात्मक उपाय योजनाचे पालन करणे
बंधनकारक असल्याचे ही त्यांनी कळविले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.