कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : शिरोली एमआयडीसी पोलीस ठाणे येथील हवालदार संजीत विलास जगताप हे कोरोना च्या संसर्गामुळे संजय घोडावत विद्यापीठातील कोविड केंद्रामध्ये उपचार घेताना 26 ऑगस्ट रोजी मयत झाले. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आज 50 लाख रुपयांचा धनादेश दिवंगत श्री. जगताप यांच्या पत्नी आश्विनी जगताप यांना दिला.
काही अडचण असल्यास, मुलांच्या
शिक्षणाबाबत काही मदत लागल्यास जरुर
संपर्क करा. सहकार्य केले जाईल असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी वडील
विलास जगताप, आई आक्काताई जगताप मुलगा यश व मुलगी दर्शना उपस्थित होते.
0000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.