** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 13, 2020

हॉटेल,रेस्टॉरंट्स,खाद्यगृहाना पार्सल सेवेसाठी रात्री 9 पर्यत परवानगी

 


 

कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, खाद्यगृह या आस्थापनांना पार्सल सेवा देण्यासाठी रात्री 9 पर्यत परवानगी देण्यात आली असून  यामधून बस स्थानक, रेल्वे रुग्णालये व महामार्गावरील आस्थापना यांना वगळण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी दिले आहेत.

           

कोरोना विषाणू (कोकिड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली आहे. जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणताही आपती रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम प्राधिकारी आहेत.

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील No. DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक २९ जून २०२० रोनीच्या आदेशामध्ये त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हातील रुग्ण स्थितीनुसार आदेश करणेबाबत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत.

राज्य शासनाकडील निर्देशानुसार जिल्हातील हॉटेल्स/लॉजेस (निवासी व्यवस्थेचे) 100 टक्के क्षमतेसह सुरु राहतील असे नमुद केलेले आहे. परंतु यात निवास व्यवस्था नसलेल्या हॉटेल्स व रेस्टॉरंटसचा समावेश नाही. फुडकोर्टस व  रेस्टॉरेटस यांना फक्त पार्सल सुविधा देता येईल असे निर्देशित करणेत आलेले होते. पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांनी जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंटस, खाद्यगृह या आस्थापना यांनी पार्सलसेवा देण्याकरीता वेळ निश्चित करणे करण्याबात विनंती केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, खाद्यगृह या आस्थापनांना पार्सलसेवा देणेची रात्री 9  पर्यंत  देण्याची  परवानगी देण्यात येत आल्याचे  जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आदेशात नमूद केले आहे..

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.