कोल्हापूर,
दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी
प्रशासनामार्फत उपाय योजना राबविल्या जात असून नागरिकाना खबरदारीच्या सूचना दिल्या
जात आहेत. मात्र काही नागरिकाकडून प्रशासानमार्फत दिलेल्या सूचनांचे पालन होत
नसल्याचे निदर्शनास येत आहेत. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायती व
ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
कार्यक्षेत्रात मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हँडग्लोव्हज न वापरणे
याबाबत दंड वसुल करण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस
अधिकारी व कर्मचारी यांना प्रदान करण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी दौलत
देसाई यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणू
(कोकिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897
मधील तरतूदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे आणि
त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात
कोव्हिड १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय
योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात
आलेली आहे. त्याच प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील तरतुदी प्रमाणे
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे कोणताही आपती
रोखण्यासाठी किंवा आपत्तीविरुध्द प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी सक्षम
प्राधिकारी आहेत. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, आपत्ती
व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील No.
DMU/2020/CR.92/DisM-1 दिनांक २९ जून २०२० रोनीच्या आदेशामध्ये त्या त्या
जिल्ह्यातील परिस्थिती प्रमाणे संबंधीत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना जिल्हातील
रुग्ण स्थितीनुसार आदेश करणेबाबत सर्वाधिकार देण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील नगरपालिका, महानगरपालिका,
नगरपरिषद, नगरपंचायती व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व
स्थानिक स्वराज्य संस्था यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी काढण्यात आलेल्या
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सर्व नागरिक सर्व शासकीय व खासगी आस्थापनांना
रस्त्यावरील व फिरते फळ व भाजी विक्रेते, दुकानदार व व्यावसायिक आस्थापना
यांच्याकडून मास्क न वापरणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, हँडग्लोव्हज न वापरणे
इत्यादी कृत्यांसाठी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने निश्चित केलेल्या दंडाच्या रक्कमेप्रमाणे वसुलीची कार्यवाही करण्यासाठी
पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दंड
करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. संबंधीत भौगोलिक क्षेत्रात दंडाची वसुल
केलेली रक्कम ती त्या संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेत जमा करणे बंधनकारक राहील. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना साथरोगाचा
प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या
ठिकाणी मास्क, चेहरा झाकावयाचे साधन वापरणे बांधनकार असेल. तसेच सार्वजनिक ठिकाणी
दारु, पान, तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ खाण्यास व थूंकण्यास परवानगी असणार नाही.
रस्त्यात किंवा रस्त्याजवळ (सार्वजनिक ठिकाणी) इत्यादी ठिकाणी उपद्रव करणे जसे, की
कोणत्याही व्यक्तीस त्रास होईल अशा रीतीने थुंकू नये, असेही जिल्हादंडाधिकारी
यांनी आदेशात नमूद केले आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.