** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 25, 2021

आजअखेर 1 लाख 34 हजार 012 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2335 प्राप्त अहवालापैकी 2127 अहवाल निगेटिव्ह तर 208 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 21968 प्राप्त अहवालापैकी 20514 अहवाल निगेटिव्ह तर 1454 अहवाल पॉझिटिव्ह. (726 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1115 प्राप्त अहवालापैकी 658 निगेटिव्ह तर 457 पॉझीटिव्ह  असे एकूण 2119 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 32 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 49 हजार 278 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 34 हजार 012 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 682 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 2119 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-18, भुदरगड-38, चंदगड-38, गडहिंग्लज-77, गगनबावडा-8, हातकणंगले-270, कागल-76,  करवीर-648, पन्हाळा-182, राधानगरी-44, शाहूवाडी-61, शिरोळ-80, नगरपरिषद क्षेत्र-119, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 395, इतर जिल्हा व राज्यातील-20 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-3616, भुदरगड- 4082, चंदगड- 3273, गडहिंग्लज- 5386, गगनबावडा- 621, हातकणंगले-16293, कागल-4981, करवीर-20933, पन्हाळा-7462, राधानगरी-3270, शाहूवाडी-3401, शिरोळ- 9165, नगरपरिषद क्षेत्र-19541, कोल्हापूर महापालिका 41 हजार 650 असे एकूण  1 लाख 41 हजार 329 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 949 असे मिळून एकूण 1 लाख 49 हजार 278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 49 हजार 278 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 34 हजार 012 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 हजार 584 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 682 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.