कोल्हापूर,
दि.7 ( जिल्हा माहिती कार्यालय ): ग्रामीण भागात कोरोना रूग्णांची वाढती संख्या
तसेच रूग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनच्या सिलेंडचा भेडसावणारा प्रश्न पाहून
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर शिक्षक संघाच्या ( सुटा ) वतीने आज जिल्हा परिषदेला 5O
ऑक्सिजन फ्लो मीटरर्स प्रदान करण्यात आले.
सुटाने येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून
मानवतेच्या भावनेतून तातडीने पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन सुमारे दीड लाख
रुपये किमतीची 50 ऑक्सीजन फ्लो मीटरर्स खरेदी
करून जिल्हा परिषदेला देण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयानुसार सदर उपकरणे कोल्हापूरमध्ये उपलब्ध नसल्याने दिल्लीवरुन मागविण्यात आली. ही उपकरणे ग्रामीण
भागात देण्यात येणार आहेत. सदरील उपकरणे जि.प.चे आरोग्य व बांधकाम सभापती हंबीरराव
पाटील, प्र . जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमतीडॉ. यु. जी. कुंभार , माता
व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील, सुटाचे कार्यवाह (
कोल्हापूर ) डॉ. डी. आर. भोसले, कार्यकारणी सदस्य प्रा. सयाजी पाटील व प्रा.
सुनीता अमृतसागर उपस्थित होते. याकामी सुटाचे प्रमुख समन्वयक प्रा. एस. जी. पाटील, प्रा. सुधाकर मानकर, प्रा टी. व्ही. स्वामी,
प्रा. ए. पी. देसाई यांचे मार्गदर्शन तर डॉ.आर. के. चव्हाण, डॉ अरुण पाटील, डॉ.
गजानन चव्हाण, डॉ.अरुण शिंदे, डॉ. यु ए. वाघमारे
यांचे सहकार्य लाभले.
000000


No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.