** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 17, 2021

मागासवर्गीय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांकडून कोणऱ्याही प्रकारची फी वसुल न करण्याचे आवाहन

 

 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): माहे जून 2021 पासून सन 2021-22 हे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. जिल्ह्यातील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांचे अभ्यासक्रम सुरू असणाऱ्या महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयामध्ये प्रवेशित शिष्यवृत्तीधारक पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये. मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित महाविद्यालयावर शासन निर्णयानुसार फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व परीक्षा फी व इतर योजनांचा लाभ https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर दिला जातो, असेही समाज कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

           

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.