कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) :
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, विजाभज, इमाव
व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी
शिक्षण फि, परीक्षा फि व इतर ऑनलाईन योजनांसाठी http://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली आहे. या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 30 जून पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी
माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली आहे.
कोविड19 विषाणू संसर्गामुळे काही महाविद्यालये
बंद आहेत. ऑनलाईन पध्दतीने अभ्यासक्रम शिकवला जात असल्याने विद्यार्थी
महाविद्यालयात उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे
अद्यापही शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले नसलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gov.in या
संकेतस्थळावर तात्काळ अर्ज भरावेत.
तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज
छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे
वर्ग करावेत, असे आवाहनही श्री. लोंढे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.