** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 22, 2021

अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांना आवाहन

 


          कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप इंडिया हि योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत सिडबीने या रक्कमेची सुक्ष्म हमी कवच तयार केले असून लाभार्थ्यांना जे कर्ज दिले जाते त्याला सिडबी हमी देईल, असे समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचा स्वहिस्सा म्हणून प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के रक्कम द्यावी. केंद्र शासनाच्या  स्टँड अप इंडिया या योजनेचा लाभ घेऊन प्रकल्पाची उभारणी केली आहे, अशा अनुसूचित जाती व नवबौध्द समाजातील घटक उद्योजकांना 15 टक्के मार्जिन मनी राज्य शासन उपलब्ध करुन देणार आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्या नंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित मार्जिन मनी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.