** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 3, 2021

येत्या 21 जून रोजी डाक अदालत

 

       

कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) :  पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्या कार्यालयामध्ये येत्या 21 जून रोजी दुपारी 12 वा. 48 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक, (कोल्हापूर विभाग) यांनी दिली.

             गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल  ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु, मनी ऑर्डर बचत बँक खाते, प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा.

               संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक निर्देशक डाकसेवा आणि सचिव, डाक अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल यांचे कार्यालय, गोवा रिजन पणजी 403001  यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 11 जून पर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची  दखल घेतली जाणार नाही.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.