** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 7, 2021

आजअखेर 1 लाख 6 हजार 333 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2408 प्राप्त अहवालापैकी 1836 अहवाल निगेटिव्ह तर 511 अहवाल पॉझिटिव्ह (61 अहवाल नाकारण्यात आले). अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 3068 प्राप्त अहवालापैकी 2680 अहवाल निगेटिव्ह तर 388 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1987 प्राप्त अहवालापैकी 1437 निगेटिव्ह तर 550 पॉझीटिव्ह  असे एकूण 1449 अहवाल पॉझीटिव्ह आहेत तर  एकूण 44 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आज अखेर एकूण 1 लाख 23 हजार 821 पॉझीटिव्हपैकी 1 लाख 6 हजार 333 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 13 हजार 534 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 1449 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-47, भुदरगड-34, चंदगड-31, गडहिंग्लज-42, गगनबावडा-8, हातकणंगले-148, कागल-35,  करवीर-325, पन्हाळा-114, राधानगरी-24, शाहूवाडी-42, शिरोळ-66, नगरपरिषद क्षेत्र-100, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 397, इतर जिल्हा व राज्यातील-36 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-2804, भुदरगड- 3407, चंदगड- 2884, गडहिंग्लज- 4598, गगनबावडा- 531, हातकणंगले-13199, कागल-3955, करवीर-15914, पन्हाळा- 5707, राधानगरी-2515, शाहूवाडी-2965, शिरोळ- 7683, नगरपरिषद क्षेत्र-14981, कोल्हापूर महापालिका 35 हजार 269  असे एकूण  1 लाख 16 हजार 412 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 7 हजार 409 असे मिळून एकूण 1 लाख 23  हजार 821 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 1 लाख 23 हजार 821 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 1 लाख 6 हजार 333 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 3 हजार 954 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 13 हजार 534 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.