कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्रामार्फत राजर्षी शाहू महाराज
जयंती साजरी करण्यात आली.
प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे फोटो पूजन व दीप प्रज्वलाने करण्यात
येवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमास पेठवडगाव पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस
निरीक्षक स्वाती
सूर्यवंशी, सहकारी
प्रियांका पाटील, जिल्हा
समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, सहाय्यक सनियंत्रण अधिकारी उमेश लिंगनूरकर, सी. एम. आर. सी. अध्यक्षा तनुजा मुल्लांनी, सचिव
सुलोचना पाटील, सी एम आर
सी व्यवस्थापक अमृता पाटील, क्षेत्रीय
समन्वयक गौरी उरूनकर, लेखापाल, सहयोगिनी व स्वंय सहाय्यता बचत गटातील महिला उपस्थित
होत्या .
माविम कोल्हापूर जिल्ह्यातील 6 लोकसंचलित साधन केंद्रातील 68 गावात व नगरपरिषद कार्यक्षेत्रात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी उरूनकर यांनी तर आभार प्रदर्शन केदार लंगरकर यांनी केले.
000000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.