** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, June 11, 2021

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कंत्राटी पदावर भरती

 


कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीने माळी पद भरण्यात येणार आहे. हे पद कंत्राटी पध्दतीचे व एकत्रित मानधनावर आहे. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आपले अर्ज 21 जून पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, दूरध्वनी क्र. 0231-2666185 वर संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.