कोल्हापूर, दि. 4, (जिल्हा
माहिती कार्यालय) : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार,
राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार, अर्जून पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, मौलाना
अब्दुल कलाम ट्रॉफी (विद्यापिठासाठी) सन 2021 पुरस्कारासाठी नामनिर्देशनाचा
प्रस्ताव दि. 21 जून पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा
क्रीडा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
अर्जदारानी विहित
नमुन्यातील अर्ज कोणत्याही विभागाची/व्यक्तीची शिफारस न घेता थेट केंद्र शासनाच्या
sruendra.yadav@nic.in किंवा gimish.kumar@nic.in या ईमेलवर सादर करावे.
केंद्र शासनाच्या विविध पुरस्कारासाठी सविस्तर माहिती, नियमावली विहित नमुना अर्ज
https//yas.nic.in/spotrs या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विहित कालावधीनंतर प्राप्त
होणारे अर्ज अथवा अपूर्ण अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे प्रसिध्दीपत्रकात
नमुद केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.