कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण
कार्यक्रम योजनेअंतर्गत जिल्ह्यामधील उपलब्ध असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करू इच्छीणाऱ्या किंवा यापूर्वी आरोग्य क्षेत्रात काम केलेल्या 18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर इ. क्षेत्रामधील विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण प्रदान करून, त्यांचे कौशल्य विकसीत करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA) अंतर्गत मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण
कार्यक्रम राबविला जाणार आहे. या योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे प्रामुख्याने On Job ट्रेनिंगच्या माध्यमातून देण्यात येणार असून उमेदवारांसाठी पूर्णपणे निशुल्क असणार आहे. मोफत प्रशिक्षणाकरिता जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती पुढील Google Form लिंकच्या आधारे नोंदवावी. link - https://forms.gle/gBfxSv7DtBjQ4vhH7
अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या 0231-2545677 दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा व जास्तीत-जास्त उमेदवारांनी आपली नावे प्रशिक्षणाकरिता नोंदवावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.