** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 14, 2021

खेळाडू विद्यार्थ्यांनी सवलतीच्या गुणासाठी 14 जून पासून प्रस्ताव सादर करावेत


 

        कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या खेळाडू, विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण मिळण्यासाठी दिनांक 14 जून पासून दुपारी 3 ते 5 या वेळेतच दोन प्रतित प्रस्ताव सादर करावेत.

            कोविड-19 या रोगामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10 वी) परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थ्याच्या बाबतीत इयत्ता 8 वी व 9 वी मधील क्रीडा स्पर्धेतील सहभागी खेळाडू व सन 2020-21 या वर्षा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या या खेळाडू विद्यार्थ्यांचे इयत्ता 11 वी मधील स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरुन खेळाडूचे वाढीव ग्रेसगुण परिपूर्ण विहीत नमुन्यातील प्रस्ताव माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे  सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.    

 

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.