** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 8, 2020

मध्यप्रदेशमधील 440 तर सिंधुदुर्गमधील 40 कामगार रवाना -जिल्हाधिकारी दौलत देसाई



            कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) :  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले मध्यप्रदेशमधील 440 राजस्थानमधील 49, कर्नाटकमधील 15 असे परराज्यातील 504 कामगार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील 40 जण आजअखेर रवाना झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
        लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा व्यक्तींना आपापल्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यामध्ये जाण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार कोल्हापूर जिल्ह्यामधून बाहेर जाणाऱ्या तसेच बाहेरच्या जिल्ह्यामधून कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने  https://bit.ly/Kopentryexit ही लिंक तयार केली आहे. यावर संबंधितांनी नोंदणी केली होती.
            परराज्यातील 10 हजार 698 जणांची यादी संबंधित राज्यातील त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. यामध्ये बिहार राज्यातील 181, मध्यप्रदेशमधील 769, राजस्थानमधील 82, कर्नाटकमधील 15 अशा  1 हजार 47 जणांना संबंधित राज्याकडून मंजुरी मिळाली आहे. मंजुरीनंतर मध्यप्रदेशमधील 440, राजस्थानमधील 49, कर्नाटकमधील 15 असे 504 जण रवाना झाले आहेत.
            कोल्हापूर जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्या 6 हजार 167 जणांची यादी त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील 37, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40, सांगलीमधील 1 हजार 50, सोलापूरमधील 492, पुण्यातील 1 हजार 514, नाशिकमधील 57, जलगावमधील 61, औरंगाबादमधील 40, लातुरमधील 167, नांदेडमधील 11, बुलढाणामधील 35, चंद्रपूरमधील 51 आणि गोंदियामधील 25 अशा 3 हजार 580 जणांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी सिंधुदुर्गमधील 40 जण रवाना झाले आहेत.  प्रांताधिकारी यांच्या सहीने परवाना पत्र देवून ज्या त्या तालुक्यातून  मंजुरी मिळालेल्या व्यक्तींना तहसिलदार उद्या रवाना करतील.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.