कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय) :- जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी
कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा,
बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1
हजार 73 जण घेत आहेत.
करवीर
तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- घुगरे सर यांचे निवासी
गुरुकुल वडगाव. अशोकराव माने ग्रुप वाठार
तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय
आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी
- पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी. कागल
- श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी
कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.