कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती
कार्यालय) : प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन होवून विषाणूचा संसर्ग पसरण्यास
योग्य परिस्थिती निर्माण होत असल्यास त्या विरोधात तात्काळ कार्यवाही करावी आणि
बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई
यांनी आज दिली.
महापालिका
आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्ह्यातील
सर्व नगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत पत्र
पाठविले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
विविध प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. पंरतु जिल्ह्यामध्ये मागील चार
दिवसात दुचाकी वाहनावरुन अनुज्ञेय कारणा व्यतिरिक्त एका पेक्षा जास्त व्यक्तींची
ये-जा होत आहे. चारचाकी वाहनामधून 1+2 म्हणजेच चालक अधिक दोन प्रवाशांपेक्षा जास्त
व्यक्तींची वाहतूक होत आहे. सायंकाळी 7 वाजल्यानंतर काही ठिकाणी दुकाने सुरु ठेवली
जात आहेत. रस्त्याच्याकडेला असणाऱ्या खाद्य पदार्थांच्या टपऱ्या काही प्रमाणात
सुरु आहेत. बरेचसे नागरिक गटा गटाने एकत्र येवून थांबतात त्यामुळे पाच व
त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र न येणे बाबत आदेशाचे तंतोतंत पालन होत नाही.
दुकानासमोर ग्राहकांकडून सामाजिक अंतर राखण्याचे पालन होत
नाही. शॉपिंग काँम्प्लेक्समधील जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त दुकाने उघडली जात
आहेत. सायंकाळी 7 नंतर नागरिक अत्यावश्यक कारणा व्यतिरिक्त संचार करीत आहेत.
प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन होवून विषाणूचा संसर्ग
पसरण्यास योग्य परिस्थिती निर्माण होत असल्यास त्या विरुध्द तात्काळ कार्यवाही
होणे आवश्यक आहे. बंदी आदेशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उचित कार्यवाही
अपेक्षित आहे.
वरील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व त्यास सहाय
करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम
188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे
कारवाई करण्यात यावी. स्थानिक प्राधिकरणाऱ्या अधिकारी कक्षेत दंडनिय कारवाई सुध्दा
करण्यात यावी, असे यात म्हटले आहे.
.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.