** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 11, 2020

जिल्ह्यात एकूण 696 पॉझीटिव्ह 594 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 696 रूग्णांपैकी 594 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपर्यंत 35 प्राप्त अवालापैकी 1 अहवाल पॉझीटिव्ह, 29 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 5 अहवाल नाकारण्यात आले. आजअखेर जिल्ह्यात एकूण 94 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज रात्री 8 वाजेपर्यत प्राप्त 1 पॉझीटिव्ह अहवालामध्ये हातकणंगले तालुक्यातील 1 आहे.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 70, चंदगड- 74, गडहिंग्लज- 80, गगनबावडा- 6, हातकणंगले- 8, कागल- 57, करवीर- 14, पन्हाळा- 25, राधानगरी- 63, शाहुवाडी- 175, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 688 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 696 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 696 रूग्णांपैकी 594 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 94 इतकी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.