कोल्हापूर,दि.
11 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 695 रूग्णांपैकी 572 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 136 प्राप्त अवालापैकी 134
अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 115 पॉझीटिव्ह
रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज
दिली.
आज सकाळी 10
वाजेपर्यत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवालामध्ये भुदरगड तालुक्यातील 2 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 70, चंदगड- 74,
गडहिंग्लज- 80, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 57, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहुवाडी- 175, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 687 आणि
पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 695 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 695 रूग्णांपैकी
572 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 115 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.