कोल्हापूर,दि.
13 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात आजअखेर 710 रूग्णांपैकी 611 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 93 प्राप्त अवालापैकी 91 अहवाल निगेटिव्ह
तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 91 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10
वाजेपर्यत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवालामध्ये भुदरगड तालुक्यातील-1 व चंदगड तालुक्यातील-1
असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि
मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 71, चंदगड-
75, गडहिंग्लज- 81, गगनबावडा- 6, हातकणंगले- 9, कागल- 57, करवीर- 19, पन्हाळा- 27,
राधानगरी- 64, शाहुवाडी- 176, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-25 असे एकूण 702 आणि पुणे -1,
सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8
असे मिळून एकूण 710 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 710 रूग्णांपैकी
611 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे
आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 91 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.