** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 15, 2020

विभागीय स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन




कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): विभागीय स्तरावरील डाक अदालत दिनांक 22 जून रोजी सकाळी 11 वा. प्रवर अधीक्षक यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/ मनीऑर्डर/बचत खाते/प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ईश्वर पाटील, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 416003 यांच्या नावे दोन प्रतींसह दिनांक 19 जून पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.