** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 11, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी कौशल्य विकास विभागाच्या वेबपोर्टलचा लाभ घ्यावा -ज. बा. करीम



कोल्हापूर,दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राच्या वेबपोर्टलचा लाभ घेऊन बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा.करीम यांनी केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही तांत्रिक कारणास्तव बेरोजगार झालेल्या व नोकरी इच्छुक बेरोजगार उमेदवारांना नोकरीची गरज आहे. अशा बेरोजगारांसाठी खासगी व सार्वजनिक आस्थापनांनी या  वेबपोर्टलचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, भवानी मंडप, कोल्हापूर या कार्यालयामार्फत खासगी किंवा सार्वजनिक आस्थापनेची नोंदणी करून या कार्यालयामार्फत सेवा सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये रिक्त पदे अधिसुचित करणे, बेरोजगार उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कुशल मनुष्यबळ माहितीची उपलब्धता, रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमातून रिक्तपदे अधिसुचित करणे, कौशल्य विकास प्रशिक्षित उमेदवारांची माहिती, मनुष्यबळ माहिती नोदंणीबाबत सुविधा(ईआर-1) हे सर्व  www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. बेरोजगार उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, नाव, पत्ता ई-मेल, मोबाईल नंबर ही माहिती संबंधितांना प्राप्त होऊ शकते.
संबंधित आस्थापनेतील रिक्त पदांची नोंदणी वेबपोर्टवर प्राप्त युजर आयडी व पासवर्डचा वापर करून माहिती डाऊनलोड करू शकतात. तसेच प्रत्येक ईआर(1) ची सांख्यिकी माहिती प्रत्येक तिमाहीनंतर प्रत्येक महिन्याच्या 1 ते 30 तारखेपर्यंत भरण्याची दक्षता घ्यावी. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता व मार्गदर्शन केंद्र, भवानी मंडप, कोल्हापूर कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा.
        0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.