कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): पोस्टमास्टर जनरल, गोवा पणजीव्दारे दिनांक 26
जून 2020 रोजी सकाळी 11 वा. पोस्टमास्टर जनरल गोवा रिजन पणजी यांच्या
कार्यालयामध्ये 44 वी डाक अदालत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती प्रवर अधीक्षक
ईश्वर पाटील यांनी दिली.
गोवा
रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण
सहा आठवड्याच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या
डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषत: टपाल वस्तु/ मनीऑर्डर/बचत खाते/प्रमाणपत्र
इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह
केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव,
हुद्दा इत्यादी.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहायक
नदेशक डाक सेवा के. बालाराजू आणि सचिव डाक अदालत पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय,
गोवा रिजन पणजी 40.001 यांच्या नावे दोन प्रतींसह दिनांक 18 जून पर्यंत अथवा
तत्पूर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.