कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय)
: 12
जून आंतरराष्ट्रीय बाल कामगार विरोधी दिनाचे औचित्य सा धून जिल्ह्यातील सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य व्यावसायिकांनी बाल व किशोरवयीन बालकांना कामावर न ठेवण्याचे आवाहन सहाय्यक कामगार
आयुक्त अनिल गुरव यांनी केले आहे.
बाल व किशोरवयीन
कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर
ठेवणे तसेच 14 ते 18 या वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग
व प्रक्रियामध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे.
मालकाने/ नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास, त्यांना 20 ते 50 हजार रूपयांपर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास होऊ
शकतो किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.
कोणत्याही
आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बालकास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये 18
वर्षाखालील किशोरवयीन बालकांस कामावर ठेवल्याचे निदर्शनास आल्यास सहाय्यक कामगार
आयुक्त कार्यालय, शाहुपूरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर यांचेकडे संपर्क साधावा.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.