** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, October 3, 2021

आजअखेर 2 लाख 122 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 300 प्राप्त अहवालापैकी 298 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 387 प्राप्त अहवालापैकी 384 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझिटिव्ह (17 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1516 प्राप्त अहवालापैकी 1496 निगेटिव्ह तर 20 पॉझीटिव्ह असे एकूण 25 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 6 हजार 239 पॉझीटिव्हपैकी 2 लाख 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 336 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 25 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-0, चंदगड-0,  गडहिंग्लज-1, गगनबावडा-0, हातकणंगले-1, कागल-0, करवीर-2, पन्हाळा-1, राधानगरी-0 शाहूवाडी-2, शिरोळ-1, नगरपरिषद क्षेत्र-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-8, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5449, भुदरगड- 5114, चंदगड- 3902, गडहिंग्लज- 7595, गगनबावडा-732, हातकणंगले-23463, कागल-8026, करवीर-31749, पन्हाळा-10779, राधानगरी-5014, शाहूवाडी-5036, शिरोळ- 13715, नगरपरिषद क्षेत्र-22581, कोल्हापूर महापालिका 53 हजार 983 असे एकूण 1 लाख 97 हजार 491 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 748 असे मिळून एकूण 2 लाख 6 हजार 239 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 लाख 6 हजार 239 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2 लाख 122 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 781 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 336 इतकी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.