** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 1, 2021

आजअखेर 2 लाख 32 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 447 प्राप्त अहवालापैकी 437 अहवाल निगेटिव्ह तर 10 अहवाल पॉझिटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 495 प्राप्त अहवालापैकी 492 अहवाल निगेटिव्ह तर 3 अहवाल पॉझिटिव्ह (10 अहवाल आरटीपीसीआरला पाठविण्यात आले आहेत). खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 1256 प्राप्त अहवालापैकी 1221 निगेटिव्ह तर 35 पॉझीटिव्ह असे एकूण 48 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 6 हजार 194 पॉझीटिव्हपैकी 2 लाख 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 385 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 48 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड-1, चंदगड-0,  गडहिंग्लज-0, गगनबावडा-0, हातकणंगले-1, कागल-5, करवीर-6, पन्हाळा-0, राधानगरी-0 शाहूवाडी- 3, शिरोळ-0, नगरपरिषद क्षेत्र-7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-22, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5446, भुदरगड- 5114, चंदगड- 3902, गडहिंग्लज- 7594, गगनबावडा-732, हातकणंगले-23461, कागल-8026, करवीर-31745, पन्हाळा-10778, राधानगरी-5014, शाहूवाडी-5032, शिरोळ- 13714, नगरपरिषद क्षेत्र-22572, कोल्हापूर महापालिका 53 हजार 966 असे एकूण 1 लाख 97 हजार 449 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 745 असे मिळून एकूण 2 लाख 6 हजार 194 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 लाख 6 हजार 194 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2 लाख 32 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 777 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 385 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.