** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 19, 2021

23 ऑक्टोबरला पोलीस शिपाई परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

 


 

कोल्हापूर, दि.19(जिल्हा माहिती कार्यालय) :कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील एकूण ७८ पोलीस शिपाई रिक्त पदांसाठी पोलीस भरतीकरीता सन २०१९ मध्ये जाहिरात देण्यात आलेली होती. त्यापैकी ७५ पोलीस शिपाई पदाकरीता आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वा ते ११.३० या वेळेत कोल्हापूर शहरातील विविध परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र (HALL TICKET) त्यांच्या ई-मेलवर दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. परीक्षेसाठी प्रवेशपत्र http://mahapolicerc.mahaitexam.in/ या पोर्टलवर/संकेतस्थळावरुन देखील डाऊनलोड करता येतील.

या परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर दोन तास अगोदर हजर राहणे आवश्यक आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षेकरीता ओळखपत्रावर नमूद असलेल्या परीक्षाकेंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे.

उमेदवारांना ओळखपत्र प्राप्त होण्याबाबत काही अडचणी असल्यास त्यांनीमदतीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक :- ९६९९७९२२३०, ८९९९७८३७२८, ९३०९८६८२७०, ९४२३१६२३९५

कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्ष :- ०२३१-२६५६७११/२६०१९५०

          या दूरध्वनी/ मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.