कोल्हापूर, दि. 4 (जिमाका) : राष्ट्रीय छात्रसेना यांचे वार्षिक प्रशिक्षण
शिबीर क्र. 304 दि. 23 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत एनसीसी भवन, कोल्हापूर
येथे होणार आहे. या प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी दरपत्रक
मागविण्यात येत आहे. पुरवठादारांनी दरपत्रक दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11
वाजेपर्यंत सीलबंद लखोट्यामध्ये मुलींचे राष्ट्रीय छात्र सेना पथक, एनसीसी भवन,
कोल्हापूर येथील कार्यालयात सादर करावे, असे आवाहन 6 महाराष्ट्र मुलींचे राष्ट्रीय
छात्र सेना पथकाचे समादेशक अधिकारी कर्नल एस गणपती यांनी केले आहे.
सर्व प्रकारची
धान्ये, तेल, डाळी, मसाल्याचे पदार्थ इ., बेकरी उत्पादने, मटण, चिकन व अंडी, दुध व
दुग्धजन्य पदार्थ, पालेभाजी, फळभाजी आणि फळे व दोन स्वयंपाकी, दोन मदतनीस व दोन
पाणी वाहक या
साठी दरपत्रक
मागविण्यात येत आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.