कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या
अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये 24 अर्ज प्राप्त झाले आहेत.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव
जाधव, अपर
जिल्हाधिकारी किशोर पवार, महसूल उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, तहसिलदार रंजना बिचकर
उपस्थित होते.
आजच्या लोकशाही दिनात
महसूल 12, जिल्हा परिषद 2, जिल्हा मुद्रांक अधिकारी 1, पोलीस अधीक्षक कार्यालय 4,
शिक्षण उपसंचालक कार्यालय 1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय 1, उपप्रादेशिक
अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियामक मंडळ 1, आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका 1,
जिल्हा शल्य चिकित्सक 1 असे एकूण 24 अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती तहसिलदार रंजना बिचकर यांनी दिली.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.