कोल्हापूर, दि. 6
(जिमाका) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या विविध
योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास
महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक हणमंत बिरादार यांनी केले आहे.
महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना, 20 टक्के
बीजभांडवल योजना आणि व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहेत. सन 2021-22 या
आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून थेट कर्ज योजनेत संपूर्ण कर्ज
महामंडळाचे राहील. 20 टक्के बीज भांडवल योजनेत 75 टक्के कर्ज बँकेचे, 20 टक्के
कर्ज महामंडळाचे व 5 टक्के लाभार्थी सहभाग राहील. व्याज परतावा योजनेत संपूर्ण
कर्ज बँकेचे राहील. लाभार्थीने कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास कमाल 12
टक्क्यांपर्यत व्याज महामंडळ लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा करेल. थेट कर्ज योजना
आणि 20 टक्के बीजभांडवल योजना ऑफलाईन असून व्याज परतावा योजना ऑनलाईन स्वरूपाची
आहे. ऑफलाईन योजनेअंतर्गत कर्ज मागणी अर्ज मिळण्यासाठी संबंधितांनी जिल्हा
कार्यालयाशी संपर्क करावा. ऑनलाईन योजनेंतर्गत www.msobcfde.org या संकेतस्थळावरील व्याज परतावा
योजना हा पर्याय निवडून अर्ज, संबंधित कागदपत्रे पोर्टलवरून सादर करावीत.
अधिक माहितीसाठी महामंडळाचे कोल्हापूर जिल्हा कार्यालय महाराष्ट्र
राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक
न्याय भवन, विचारे माळ, ताराराणी चौक, कोल्हापूर, फोन नं. 0231-2653512 येथे
संपर्क करावा. तसेच महामंडळाची www.msobcfde.org वेबसाईट पहावी, असेही श्री. बिरादार
यांनी कळविले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.