कोल्हापूर, दि. 29 (जिमाका): जिल्ह्यातील निश्चित केलेल्या ठिकाणामधील शासकीय कार्यालयीन जागेत तात्पुरत्या
स्वरुपात खासगी आधार संच सुरु करण्याची कार्यवाही सुरु आहे. दि. 1 नोव्हेंबर
ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वत:चे खासगी आधार संच असणाऱ्या इच्छुकक
ग्रामपंचायत अथवा आपले सरकार सेवा केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर
(टपाल शाखा) येथे
समक्ष कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.
10 डिसेंबर 2021 या अंतिम दिनांकानंतर आलेले
कोणतेही अर्ज किंवा कागदपत्रे स्विकारले जाणार नाहीत. अर्जाचा नमुना, अटी, शर्ती व इतर माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://kolhapur.gov.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यापूर्वी ज्या अर्जदारांनी खासगी आधार संच सुरु करण्याकरिता
मागणी अर्ज केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज करावयाचे
आहेत.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.