कोल्हापूर,
दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) :
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त
विद्यमाने दिनांक 1 ऑक्टोबर रोजी
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
या वेबिनार मध्ये डॉ. देशपाडे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध
कायद्याबाबत आणि हेल्पेज इंडियाचे संचालक श्री. बोरगावकर यांनी ज्येष्ठ नागरिक
म्हणून जगताना' या विषयावर व्याख्यान केले. या वेबिनारसाठी दिडशे ज्येष्ठ नागरिक व
विविध स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी तसेच अधिकारी/कर्मचारी ऑनलाइन माध्यमातून
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती डवर यांनी
केले.आभार समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, विशाल लोंढे यांनी मानले. राष्ट्रीय
हेल्पलाईन क्र. १४५६७ वर जेष्ठ नागरिकांनी समस्या मांडाव्यात असे आवाहन श्री.
लोंढे यांनी केले.
जिल्हा
परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत ज्येष्ठ नागरीक दिनानिमित मातोश्री वृध्दाश्रम,
चंबुखडी, कोल्हापूर येथे ज्येष्ठ नागरिकांना फळे वाटप करुन जेष्ठ नागरीक दिन
उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सुर्यप्रभा चिटणीस यांनी वृध्दाश्रम कामकाजाची
सर्वांना माहिती दिली.
जिल्हा
समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी वृध्दाश्रमास प्रशासकीयदृष्टया कोणतीह अडचण
येऊ देणार नाही तसेच वैशालीताई व सुर्यप्रभाताई या दोघी बहिणींनी वृध्दाश्रमासाठी
घेतलेल कष्ट हे अमुल्य असल्याचे सांगितले. यावेळी भालचंद्र माने, शिवाजी कोळी व
श्री. सुनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
वैशाली
राजशेखर यांनी आभार मानले. यावेळी चित्रा शेंडगे,आनंदा आवळे, योगेश पाडवी, रघुनाथ
मेतके, योगेश घोरपडे व राहिल मोगल आदी उपस्थित होते.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.