** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 18, 2021

ईद-ए-मिलादसाठी मार्गदर्शक सूचना

 


कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : कोवीड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) जुलूस साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी दि. 19 किंवा 20 ऑक्टोबर 2021 (चंद्रदर्शनावर अवलंबून) ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) साजरी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

1)   कोवीड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन,आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे परिपत्रक क्र.DMU/2020/CR92/Dis-1, दिनांक 04/06/2021, सार्वजनिक आरोग्य विभाग आदेश क्र.No. Corona 2021/CR 366/Arogya-5, दिनांक 11/08/2021 तसेच आदेश क्र. No.  Corona 2021/CR 366/Arogya-5,दिनांक 24/09/2021 अन्वये "ब्रेक द चेन" अंतर्गत दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे.

2)     राज्य  शासनाच्या आरोग्य विभागाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर मोठया संख्येने गर्दी होणा-या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) शक्यतो घरात राहूनच साजरी करावी. तथापि मिरवणुका काढावयाच्या झाल्यास पोलीस प्रशासनाच्या पूर्व परवानगीने एका मिरवणुकीत जास्तीत- जास्त 5 ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त 5 इसमांना परवानगी अनुज्ञेय राहील.मिरवणुका  दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन (Social Distancing) करण्यात यावे.

3)     मिरवणुकीत सक्षम प्राधिका-याच्या पूर्वपरवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनी प्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

4)    मिरवणुकीच्या दरम्यान स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या  ‍नियमानुसार संबंधित महापालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी या बाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करावे.

5)    सार्वजनिकआरोग्य विभागाच्या दि.24/09/2021 रोजीच्या शासन आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन, मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखून धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे.

6)     प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात यावेत. केबल टि.व्ही.,फेसबुक इत्यादी माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.

7)    सबील/पाणपोई- ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी) निमित्त मिरवणुकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील (पाणपोई) लावण्यात येतात. सबील (पाणपोई) बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी. त्या ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तिंनी उपस्थित राहूनये. या ठिकाणी सीलबंद पाण्याच्या बाटलींचे वाटप करण्यात यावे. सबील (पाणपोई) च्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्यात यावे.

8)     प्रतिबंधीत (Containment Zone) क्षेत्रामध्ये सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.त्यामध्ये कोणतीही शिथीलता देण्यात येणार नाही.

9)     कोवीड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबविण्यात यावेत व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात यावी.

10)  वरील सूचना व्यतिरीक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित महापालिका/पोलीस/स्थानिक प्रशासनास असतील.

11)  कोवीड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व मिरवणुक सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सुचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे  देखील अनुपालन करावे

000000

 

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.