** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 4, 2021

आजअखेर 2 लाख 163 जणांना डिस्चार्ज

 


कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 309 प्राप्त अहवालापैकी 309 अहवाल निगेटिव्ह. अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 201 प्राप्त अहवालापैकी 200 अहवाल निगेटिव्ह तर 1 अहवाल पॉझिटिव्ह. खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 2077 प्राप्त अहवालापैकी 2059 निगेटिव्ह तर 18 पॉझीटिव्ह असे एकूण 19 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

            जिल्ह्यात आज अखेर एकूण 2 लाख 6 हजार 258 पॉझीटिव्हपैकी 2 लाख 163 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज अखेर जिल्ह्यात एकूण 313 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

            आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 19 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-0, भुदरगड-1, चंदगड-0,  गडहिंग्लज-0, गगनबावडा-0, हातकणंगले-3, कागल-0, करवीर-1, पन्हाळा-1, राधानगरी-0 शाहूवाडी-1, शिरोळ-2, नगरपरिषद क्षेत्र-3, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-8, इतर जिल्हा व राज्यातील-3 असा समावेश आहे.

            

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-5449, भुदरगड- 5115, चंदगड- 3902, गडहिंग्लज- 7595, गगनबावडा-732, हातकणंगले-23466, कागल-8026, करवीर-31750, पन्हाळा-10780, राधानगरी-5014, शाहूवाडी-5037, शिरोळ- 13717, नगरपरिषद क्षेत्र-22584, कोल्हापूर महापालिका 53 हजार 989 असे एकूण 1 लाख 97 हजार 507 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 8 हजार 751 असे मिळून एकूण 2 लाख 6 हजार 258 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

जिल्ह्यातील एकूण 2 लाख 6 हजार 258 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 2 लाख 163 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 5 हजार 782 जणांचा मृत्यू झाला आहे. आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 313 इतकी आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.