** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 25, 2021

शासकीय वसतिगृहातील विनामूल्य प्रवेशासाठी अर्ज करावेत

 


कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयाच्या अधिनस्त मुलां-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्रवर्गामधील ८ वी, ११वी व प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सन २०२१-२२ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याचे सुरू आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे अर्ज संबंधित तालुक्याच्या वसतिगृह अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक कागदपत्रासह परीपूर्ण प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृह अधिक्षकांकडे सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम या विनामूल्य सोयी असणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कार्यालय, विचारे माळ, कोल्हापूर येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ याव्दारे संपर्क साधावा.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.