कोल्हापूर दि. 4 ( जिमाका): पर्यटन सप्ताहानिमित्त रेन ऑफ रोडींग असोसिएशन यांच्यामार्फत
फोर बाय फोर गाड्यांचे ‘ऑफरोडींग रेसर’ चे आयोजन करण्यात आले. पालकमंत्री सतेज
पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावर
यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून मोहिमेची सुरुवात
खासदार धैर्यशील माने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी तहसीलदार
कविता ढवळे, धृव मोहिते, अरुण इंगवले,
प्रमोद पाटील, युवराज साळुंखे, आदित्य बेडेकर, योगेश भारती, वासिम सरकवास
उपस्थित होते.
रेन ऑफ
रोडींगसाठी कोल्हापूर, सांगली सातारा जिल्ह्यातील सुमारे 40 गाड्यांची नोंदणी झाली
होती. सुमारे 12 ते 14 किलोमीटर अंतराची
ही रॅली विविध अडचणी पार करीत गेली. मोहिमेचे नियोजन प्रताप माने, आरती जगताप,
अमित जगताप, प्रसाद माने, श्री. ओमलिगडे यांनी केले.
00000




No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.