** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 22, 2021

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे येत्या बुधवारी शिबीराचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जनतेच्या सोईसाठी शिबीर कार्यालयात अपॉइन्टमेंट घेण्यासाठी एकसुत्रता यावी यासाठी सर्व नागरिक/ वाहनधारकांना कळविण्यात येते की, माहे नोव्हेंबर 2021 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी ऑक्टोबर 2021 महिन्याच्या 27 तारखेस सकाळी 11 वाजल्यापासून शिबीर व स्लॉट सोडण्यात येणार असून संबंधित तालुक्याच्या ठिकाणासाठी 27 ऑक्टोबर 2021 रोजी अपॉइन्टमेंट घ्यावी. या सुविधेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.